बुधवार, दिनांक 22 मे 2024 रोजी आपल्या विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सने यशस्वी दोन वर्ष पूर्ण करून तिसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. 22 मे 2024 रोजी एक रोपट रुजवलं आणि आज दोन वर्षांनी या रोपट्याचं मुळा घट्ट होऊन वृक्षात रूपांतर होत असून त्याचा विस्तार हडपसर, पिंपरी चिंचवड, बारामती, कात्रज पर्यंत पसरला आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास आणि दिलेली साथ आमच्यासाठी लाखमोलाची आहे. आजवर जसे सहकार्य केले तसेच सहकार्य, तशीच सोबत या पुढच्या वाटचालीत असू द्या. तुमचं प्रेम आशीर्वाद व सदिच्छा कायम आमच्या सोबत राहू द्या